पुणे पोलिसांकडून बड्या नगरसेविकेच्या मुलाला अटक, कारण ऐकून पुण्यात खळबळ

पुणे |  देशात सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज हाणामारी, हत्या केल्याच्या घटना घडल्याचं कानावर येतं असतं. यामुळे समाजात हिंसक वातावरण निर्माण होत चालल आहे.

तसेच राज्यातील पुणे जिल्हा हा सर्वांमध्ये अव्वल असतो असं म्हटलं जातं. आता गुन्हेगारीमध्येही पुणे हळू-हळू पुढे येत असल्याचं दिसतं आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

सध्या सगळीकडे कोरोना संसर्ग रोगाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच अनेक रूग्णांना रेमडेसिवीर हे इंजेक्शनची गरज भासत आहे. परंतू यातही आता काळाबाजार सुरू झाला आहे.

हे इंजेक्शन काळाबाजारात खऱ्या किंमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट किंवा  त्याहीपेक्षा जास्त दराने विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.त्यामुळे पोलिस या प्रकरणात लक्ष घालत असून, यात काळाबाजार करणाऱ्यांवर चांगलीच कारवाई करत आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये काळाबाजार करत असल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवकाच्या मुलाला पोलीसांनी अटक केलं असल्याची माहीती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली प्रभागातील भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा वैभव मळेकर याला रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून सहा रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये वैभव अंकुश मळेकर आणि शुभम आरवडे यांच्यावर खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, यांच्याकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

तसेच, राहुल खाडे आणि विजय पाटील या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

या सर्व आरोपींनी चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन मिळवून ते स्वत:च्या ताब्यात ठेवले होते. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ते या इंजेक्शनाचा बेकायदेशीर वाटेल त्या किंमतीला विकायचे. धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसताना इंजेक्शन विकताना ते रंगी हात पकडले गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच झालं…

रेल्वे स्टेशन मास्टरने पत्नीची केली हत्या अन् स्वत:लाही…

सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट,…

‘ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…..’…

आणखी एका बाॅलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, म्हणाली….

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy