मनसेच्या रुपाली पाटील यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश

पुणे : मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. पोलिसांनी रुपाली पाटील यांना दिलेल्या आदेशामुळे मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांच्याविरोधात हिंजवडी, खडक, बिबवेवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा दाखला देत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी रूपाली पाटील यांच्या नावाने नोटीसही जारी केली आहे. रूपाली पाटील यांना 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत झोन एकच्या हद्दीत राहण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

राजकीय हेतूने नोटीस पाठवली आहे, असा आरोप रुपाली पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.

दरम्यान, नुकतेच काहीदिवसांपूर्वी रुपाली पाटली यांनी डीजे प्रकरणावरुन चंद्रकांत दादांना गणेश मंडळाचे अध्यक्ष व्हावं, असं आव्हान केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-