पुणे | गेले अनेक दिवस विरोधी पक्षातले आमदार आणि नेते सत्ताधारी भाजपात प्रवेश करत आहेत. आणखी किती नेते भाजपात प्रवेश करणार आहेत? अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यातच पुण्यात एका अनोळखी व्यक्तीने गमतीशीर पोस्टरबाजी केली आहे.
भाजपात प्रवेश देणे चालू आहे. पण त्यासाठी काही नियम व अटी आहेत… ईडी व इन्कम टॅक्सची नोटीस आलेल्यांना प्रथम प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असलेल्यांना पहिली पसंती आणि सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव गाठीशी हवा, अशा अटी असल्या तर तुमचा भाजपात प्रवेश लगोलग होईल, अशी खिल्ली उडवणारे पोस्टर लागले आहेत.
पोस्टरच्या खाली तळटीप देखील देण्यात आली आहे. विचारधारेची कुठलीही अट नाही तसेच आमच्याकडच्या जागा फुल्ल झाल्या तर मित्रपक्षात तुम्हाला प्रवेश करून देऊ, असा चिमटा देखील काढण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि तोंडावर आलेली विधानसभा… या दोन्ही निवडणुकीच्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी स्वपक्षाला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलं.
भाजप सातत्याने विरोधी पक्षातले ‘आमके-आमके’ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा बॉम्ब टाकत असतं. अनेकदा सोशल मीडियात याची खिल्लीही उडवली जाते. फरक फक्त एवढाच आहे की अनेकदा मोबाईलवरून मेसेज फॉरवर्ड केले जातात आणि काल पुण्यात संबंधित आशयाचे पोस्टर झळकले…!
पुणेरी पाट्या जगात फेमस आहेत आता पुणेरी फ्लेक्सदेखील त्यात अॅड होतात की काय अशीच चर्चा आता पुण्यात रंगतीये.
महत्वाच्या बातम्या-
-इम्तियाज जलील यांची विजयी रॅली; संसदेत दुष्काळावर भाषण अन् रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी
नारायण राणेंचं आमंत्रण शरद पवारांनी स्विकारलं!
-‘मला पक्षात येण्यासाठी सारखं बोलावणं येतंय’; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट
-बारामतीत घुमणार मुख्यमंत्री फडणवीसांचा आवाज!
-गिरीश महाजन देशातील मोठे नेते; संजय राऊतांनी मारला शालजोडीतून टोला