धक्कादायक! फिरायला गेलेली पुण्यातील दोन कुटुंबं बेपत्ता, नक्की काय झालं?

पुण्याच्या हडपसर भागातील सातव आणि मगर कुटुंब पानशेतला फिरायला गेलं होतं. दोन्ही कुटुंबातील मिळून सात जण फिरायला गेले होते. हे सातही जण अचानक बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. 

सातव आणि मगर यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ही दोन्ही कुटुंब मिळून पानशेतला फिरायला गेली होती. खडकवासला धरणाशेजारील अॅक्वेरियस हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. बुधवारी दुपारी 11 वाजता मगर यांच्या पत्नीने तिच्या बहिणीसोबत फोनवरुन संपर्क देखील साधला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंब संपर्कात नाहीत. 

सातव कुटुंबात जगन्नाथ सातव त्यांची पत्नी आणि 5 वर्षांचा मुलगा असे आहे. तर मगर कुटुंबात सिद्धार्थ मगर, त्यांची पत्नी आणि 5 वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. दोन्ही कुटुंबातील सातजण बेपत्ता झाल्यानं हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

संपर्क होत नसल्यानं दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. अखेर दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हवेली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलीस या कुटुंबाचा शोध घेत आहेत. 

दोन्ही कुटुंबात कोण कोण आहे?

 

मगर कुटुंब-

सिद्धार्थ उर्फ हरीश सदाशिव मगर (38 वर्षे)

स्नेहल उर्फ ईश्वरी मगर

जुळ्या मुली – आरंभी आणि साईली (5 वर्षे)

 

सातव कुटुंब-

जगन्नाथ हरी सातव

सातव यांची पत्नी

त्यांचा 5 वर्षांचा मुलगा