पुणे हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्यानेच कटर ने वार करत मुलीचं डोकं फोडलं

पुणे | पुण्यातील खडक परिसरात मुलीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जन्मदात्यानेच तिच्यावर कटरने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी आरोपी पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पित्याला दारू पिण्याचं व्यसन आहे. मात्र कोरोनाकाळात आरोपीच्या हाताला रोजगार नसल्याने त्याला पैसे मिळत नाहीत. म्हणून त्याने आपल्या मुलीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मुलीने पैसे न दिल्याने आरोपी पिता मुलीला मारहाण करत होता.

छोट्या बहिणीला सोडवण्यासाठी तिची मोठी बहीण मध्ये गेली. मात्र, आरोपीने तिचही डोकं भिंतीवर आपटत तिच्यावर कटरने वार केले आहेत.

याप्रकरणी कासेवाडी परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय मोठया बहिणीने आरोपी पित्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! कैदी मुलाला सोडवण्यासाठी आईने खोदलं भलं मोठं सुरंग पण…

…तर अमृता फडणवीसांना राज्य सोडून जावं लागेल, हाच उपाय ; शिवसेना मंत्र्यांची फडणवीसांवर टीका

समुद्रात अडकले सुमारे 1 लाख मच्छीमार; प्रशासन अजूनही शांत

करिना नेपोटीजमवर बोलली अन् कंगनाची सटकली; अन् मग काय…

पावसाचे भयानक वास्तव! मुंबईमध्ये नाल्यात 2 घरे कोसळली, एका महिलेसह दोन मुली बेपत्ता