पुणे महाराष्ट्र

आई नको म्हणत होती…. मित्र आले अन् घेऊन गेले… पण आता तो कधीच परत येणार नाही!

पुणे |  पुणे-सोलापूर रोडवरील कदम-वाकवस्ती ग्रामपंचायती समोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री 1 वाजता हा अपघात झाला. यामध्ये 9 विद्यार्थ्यी जागीच ठार झाले. 

शुक्रवारी सकाळी सर्व विद्यार्थी यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी परतताना हा अपघात झाला. पण सहलीला जाण्याअगोदरची करूण कहाणी समोर आली आहे.

अपघातात मृत पावलेल्या नुर महम्मद दाराला त्याची आई जाऊ नको म्हणत होती. परंतू त्याने आईकडे खूप हट्ट धरला. शेवटी त्याचे मित्र त्याच्या घरी आले आणि नुरला घेऊन गेले. हे सगळे मित्र यवतहून रायगडला गेले होते. यवतहून निघाल्यानंतर त्यांच्यापैकी एका मित्राने लोणी काळभोरजवळ ‘रेडी टू गो’ असं व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस ठेवलं. अन् दुर्दैवाने रात्री परत येत असताना त्याच ठिकाणी त्यांच्यावर नियतीने घाला घातला.

नुरची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. तो लोणी काळभोरमधील एका महाविद्यालयात नोकरी करत बी.ए.चे शिक्षण घेत होता. खरं तर त्याला इंजिनीअर व्हायचं होतं. परंतू घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला नोकरी करत शिक्षण घ्यावं लागलं होतं.

नूरच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईने आर्त किंकाळी फोडली. ती काही वेळ भानावर नव्हती. आपला मुलगा अपघातात गेला हे तिला मान्यच नव्हतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं.

यवत आणि संपूर्ण दौंड तालुक्यात अपघाताबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या-

जागावाटपाबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलू नये- संजय राऊत

-…अन् पिडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधींनी अख्खी रात्र जागून काढली!

-आम्ही दोघी संसदेत का हसलो???, अखेर रक्षा खडसेंनी सांगितलं कारण

-युतीत बंडखोरीची शक्यता; परभणीत भाजपला हव्यात शिवसेनेच्या जागा

-“नारायण राणे या मतदारसंघातून लढणार”

IMPIMP