धक्कादायक, पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे |  पुण्यात सुखसागरनगरमधील एका कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री उशिरा हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सुखसागरनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अतुल दत्तात्रेय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32 ), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 06), अंतरा अतुल शिंदे (वय 03) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आर्थिक चणचणीतून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.

गुरूवारी रात्री अकरा वाजता सुखसागरनगरमधील एका कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगोलग घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पती-पत्नी आणि मुलगा-मुलीने गळफास घेतल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं, असं भारती विद्यापीठ पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितलं.

दरम्यान, शिंदे कुटुंबाने दोन दिवसांअगोरदच आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन रूग्णालयात पाठवले आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यात मोठ्या दहीहंडीबाबत घेतला गेला मोठा निर्णय

-शिवसेनेचा आज 54 वा वर्धापनदिन… उद्धव ठाकरे सांगणार भविष्याची दिशा!

-“पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!”

-महाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य, अन्याय अत्याचार इथे खपवून घेणार नाही- गृहमंत्री

-…म्हणून पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट