Pune Tourist Places l या प्रजासत्ताक दिनी पुण्यातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Pune Tourist Places l देशातील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये पुण्याचे नाव घेतले जाते. विशेषतः इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी पुण्यात फिरण्याचे बरेच ठिकाण आहेत. पुणे हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा मानला जातो. पुण्यात गेल्यावर मराठी संस्कृती अगदी जवळून पाहायला (Pune Tourist Places) मिळते. याशिवाय पुण्याचे स्ट्रीट फूडही पर्यटकांना खूप आवडते. जर तुम्ही पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल कोणत्या पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता याबद्दलची माहिती जाणून घेऊयात…(Pune Tourist Places)

सिंहगड किल्ला :

पश्चिम घाटाच्या सह्याद्री रांगेत वसलेला सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर अनेक लढायाही झाल्या आहेत. जर तुम्ही या प्रजकसत्ताक दिनानिमित्त फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सिंहगड किल्ला पाहायला जाऊ शकता.

Pune Tourist Places l पार्वती टेकड्या :

पुणे शहराचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी तुम्ही पार्वती हिल्सला भेट देऊ शकता. 2000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या टेकड्या 17 व्या शतकात पेशवा बाजीराव यांनी बांधल्या होत्या. या टेकड्या पार्वती मंदिर, भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे.

शनिवारवाडा :

पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्ही शनिवारवाड्याला जाऊ शकता. हा किल्ला पेशवा बाजीराव पहिला याने बांधला होता. 625 एकरांवर पसरलेल्या शनिवारवाड्याने सुरुवातीला संपूर्ण शहर व्यापले होते. पण हा किल्ला 1828 मध्ये जाळला गेला. त्यानंतर शनिवारवाड्याचे काही अवशेष पुण्यात शिल्लक आहेत.

Pune Tourist Places l आगा खान पॅलेस :

पुण्यातील आगा खान पॅलेस सुलतान आगा खान यांनी 1892 मध्ये बांधला होता. ब्रिटीश राजवटीत महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना या महालात कैद करण्यात आले होते. ज्यानंतर कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचा या महालात मृत्यू झाला. राजवाड्यात एक सुंदर संग्रहालय देखील आहे.

Pune Tourist Places l दगडूशेठ हलवाई मंदिर :

पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर हे गणेशाला समर्पित आहे. मंदिरात 40 किलो सोन्याची गणेशाची मूर्ती देखील आहे. या मंदिरात दरवर्षी 10 दिवस गणेश महोत्सवही आयोजित केला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरालाही भेट देऊ शकता.

News Title : Pune Tourist Places

महत्वाच्या बातम्या :

Manoj Jarange Live l मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा! तोडगा निघाला नाही तर…

Republic Day l प्रत्येक भारतीयाला ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यामध्ये काय फरक असतो माहीत असायलाच हवा!

Shiva Balakrishna Arrests l धाड टाकण्यासाठी गेलेलं ACB पथक अधिकाऱ्याचा बंगला पाहूनच थक्क! 40 लाख, 40 आयफोन,व्हिला सह मिळालं मोठं खबाड

Manoj Jarange Live l मराठ्यांचं वादळ शमणार? सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

Board Exam Tips l या मार्गांनी बोर्ड परीक्षेचा ताण कमी करा आणि चांगले मार्क्स मिळवा