पुण्याचा ट्राफिक प्रश्न सोडवण्यासाठी गडकरी अन् अजित पवारांची युती…!

मुंबई |  बाहेरून येणाऱ्या वाहनामुळे पुणे शहरात होणाऱ्या ट्राफिक कोंडीतून आता पुणेकरांना मुक्ती मिळणार आहे. पुण्याचा ट्राफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात केली आहे. रिंगरोडसाठी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मोठी मदत मिळणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. तसंच त्यांनी नितीन गडकरींचं अभिनंदन करत आभार देखील मानले.

नाशिक, औरंगबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई शहरातून येणार वाहतूक पुणे शहराबाहेरून वळवण्यासाठी 170 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनासह एकूण 15 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी भूसंपादन सुरू करून येत्या चार वर्षांत हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुण्याच्या रिंगरोडसंदर्भात गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बैठक झाली. केंद्रीय रस्ते निधीमधून राज्याला 1200 कोटी रूपये देण्याचं कबुल केलं आहे. त्याबद्दल मी नितीन गडकरी यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या या मदतीचा राज्याला निश्चितच फायदा होणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांनी पुण्याचा ट्राफिक प्रश्न सोडवण्यासाठी उचललेल्या पावलामुळे आता पुणेकर मात्र नक्कीच सुटकेचा निश्वास सोडतील.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित पवारांचं बजेट नाही तर जाहीर सभेतील भाषण; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

-अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर पेट्रोल डिझेल महागणार!

-अर्थसंकल्पात कुणाला काय काय मिळालं?; वाचा एका क्लिकवर

-राज्यातील 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार; अजित पवारांची मोठी घोषणा

-बळीराजाला हेलपाटे न मारावे लागता आमच्या सरकारनं कर्जमाफी दिली- अजित पवार