पुणे | कोरोनाकाळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुण्यातून अशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्यात एका नराधमानं लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिलेवर बलात्कार करत तिचे एक लाखाचे दागिने लुटले आहेत.
पीडित महिला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास फतीमानगर बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी राहिली होती. त्यावेळी, अचानक एक दुचाकीस्वार आला व पीडितेला लोणी परिसरात सोडतो असं म्हणाला. पीडित महिला घरकाम करते, पीडितेलाही कामासाठी उशीर झाल्याने ती गाडीवर बसली.
आरोपीनं महिलेला ऑफिस दाखवतो म्हणत मुंढवा परिसरात नेलं. त्याबरोबरच, तिला दागिने काढून पर्समध्ये ठेवण्यास सांगितलं. त्यांनतर आरोपीनं पीडित महिलेला अज्ञातस्थळी नेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच महिलेने काढून ठेवलेले दागिने घेऊन पसार झाला.
दरम्यान, घडलेल्या या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावत सर्व सांगितलं. मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबरच मुंढवा पोलीस सध्या आरोपीचा तपास घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
भूमिपूजनासाठी ‘विधर्मी’ नको; हिंदू महासभेनं अमित शहांना धाडलं रक्ताने लिहिलेलं पत्र
पुणेकरांनो काळजी घ्याच! पुण्यातील ‘या’ रुग्णालयातून समोर आलं धक्कादायक वास्तव!
मिशन राम मंदिर पु्र्ण आता आता लक्ष्य…; भाजपच्या धडाडीच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
मुख्यमंत्र्यांनंतर आता विरोधी पक्ष नेत्यालाही झाली कोरोनाची लागण!
मुूंबईमध्ये जोरदार पाऊस; राज्यात दोन दिवस ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा!