पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

Pune Water Supply Closed on Thursday l उन्हाळा सुरु होताच राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता भासत चालली आहे. अशातच आता पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील काही परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Pune Water Supply Closed on Thursday l खडकवासला धरणात पुढील 5 महिने पुरेल एवढाच पाणी साठा उपलब्ध! :

अगदी काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कालवा समितीची बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान पुणेकरांवर असलेले पाणी संकट दूर देखील केलं होतं. मात्र पुण्यातील खडकवासला धरणात शहराला पुढील 5 महिने पुरेल एवढाच पाणी साठा उपलब्ध असल्याची माहितीसमोर आली आहे. अगदी याच कारणामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार लटकली आहे.

मात्र कालवा समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीकपात करण्याची कसलीही गरज नसल्याचं सांगितले होते. त्यावेळी पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला आहे. मात्र अशातच आता पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाणीकपाती संदर्भात महत्वाची बातमी समोर आल्याने सर्वानाच पाणी कपातीचा टेंशन आलं आहे.

अशातच भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करावं लागणार असल्याचं दिसत आहे. यामुळे गुरुवारी पुणे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून येत्या गुरुवारी म्हणजेच 29 फेब्रुवारीला पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे शुक्रवारी पाणी कमी दाबाने येणार आहे.

Pune Water Supply Closed on Thursday l पुण्यातील ‘या’ भागांमध्ये असणार पाणी पुरवठा बंद!

संपूर्ण गणेशनगर व म्हस्के वस्ती परिसर
कळस
माळवाडी
जाधव वस्ती
विशाल परिसर
विश्रांतवाडी स. नं. 112 अ
कस्तुरबा
आदर्शनगर
कल्याणीनगर
हरीनगर
रामवाडी
शास्त्रीनगर
टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक
पराशर सोसायटी
श्री. पार्क
ठुबे पठारे नगर
जयजवान नगर
जय प्रकाशनगर
संजय पार्क
एयर पोर्ट
यमुना नगर
दिनकर पठारे वस्ती

news title : Pune Water Supply Closed on Thursday

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग न्यूज! या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार

सकाळी रिकाम्या पोटी धावणे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत

कमाईची संधी गमावू नका! आज या 3 कंपन्यांचे IPO उघडणार

उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये! पाहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

आजचे राशिभविष्य! वडिलोपार्जित संपत्ती मिळविण्यातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील