Pune Weather Update l गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच उन्हाच्या झळाने नागरिकांच्या जिवाची लाहीलाही झालेली दिसत होती. अशातच पुण्यातील नागिरिकांसाठी दिसालादायक बातमी समोर आली आहे. सध्या पुण्यामध्ये ढग आल्याचे दिसत आहे. यामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहू लाजले आहे. यामुळे पुणे शहरातील किमान तापमानात घट झाल्याची दिसत आहे.
Pune Weather Update l गेल्या 24 तासांत तापमानात 3 अंशांनी घट :
अशातच भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, सोमवारी म्हणजेच 4 मार्चला पुणे शहरातील शिवाजीनगर येथे सकाळचे तापमान 13 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत तापमानात 3 अंशांनी घट झाल्याची दिसत आहे. तसेच येत्या 2 ते 3 दिवसांत तापमानात आणखी काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील 5 ते 6 दिवसांपासून पुणे शहरात तापमान वाढल्यामुळे उन्हाचा तडाखा देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. देशातील वातावरण अस्थिर असल्याने त्याचा परिणाम पुण्यातील हवामानावर झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे.
Pune Weather Update l अनुपम कश्यपी यांनी दिली हवामानाबद्दलची माहिती :
हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी हवामानाबद्दलची माहिती देताना सांगितले की, “सध्या पुणे शहरात आकाश निरभ्र आहे आणि याचा परिणाम शहराच्या किमान तापमानात घट होत असल्याचे आहे. याशिवाय पुढील 2 ते 3 दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयएमडीच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील तापमान :
शिरूर : 10.7 अंश
लोणावळा : 10.9 अंश
आंबेगाव : 11.3 अंश
हवेली : 11.5 अंश
नारायणगाव : 11.6 अंश
माळीण : 11.6 अंश
News Title : Pune Weather Update
महत्त्वाच्या बातम्या-
IPL चा नवा हंगाम, नवा रोल; कॅप्टन कुलच्या एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील
‘आम्ही मराठे करेक्ट कार्यक्रम करु…’; जरांगेंकडून सर्वात मोठा इशारा
‘मी बायकोला सांगितलंय…’; मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याची तूफान चर्चा
मनोज जरांगे पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सगळीकडे एकच चर्चा