Pune Weather Update l पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. अगदी काही दिवसांपासून (Pune Weather Update) पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा जाणवत आहे. अशातच काल (12 जाने) पुण्यामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर या भागात सर्वात जास्त म्हणजेच 37.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पुण्यात भरदिवसा आकाश निरभ्र राहिल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक झाले आहे. मात्र आता या सगळ्याचा परिणाम पुढील तीन दिवसांत होणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात 37 ते 38 अंशांचा उच्चांक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pune Weather Update l पुणे जिल्ह्यातील लवळे येथे सर्वाधिक तापमान :
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी म्हणजेच 8 मार्चला शिवाजीनगर येथे 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अशातच पुढील चार दिवसांत कमाल तापमानात सुमारे 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मात्र काल कमाल तापमान 2.1 अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत सर्वात कमी तापमानात 16 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुणे जिल्ह्यातील इतर ठिकाणी शिवाजीनगरपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील लवळे येथे आतापर्यंत सर्वात जास्त तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तसेच काही भागात तापमान 37अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पुणे जिल्ह्यातील तापमान पाहता कमाल तापमानात दुपटीने वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Pune Weather Update l विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा!
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि विदर्भातील काही भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत असल्याचे समोर आले आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान वाशीम येथे 39. 4 अंश सेल्सिअस असल्याची माहिती IMD ने दिली आहे. तसेच सोलापूरमध्ये 39. 2 अंश सेल्सिअस, सांगली 38. 6 अंश सेल्सिअस तर मालेगाव 38. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
News Title : Today Pune Weather Update
महत्त्वाच्या बातम्या-
तुम्हाला माहितीये का? कोण आहे सोशल मीडियाचा राजा; या ॲपने पटकावला पहिला नंबर
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात MS Dhoni असं काही करणार की चाहते होणार खुश!
भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सोपी प्रोसेस
सरकारने दिला मोठा दिलासा, आता ‘या’ तारखेपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता
उद्यापासून सुरु होतोय खरमास; जाणून घ्या खरमासमध्ये काय करू नये