चिंतन शिबीर सुरू असतानाच काॅंग्रेसला जोर का झटका; ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडला पक्ष

नवी दिल्ली | देशपातळीवर काॅंग्रेसला 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून अनेक निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पराभवाची मालिका सुरू असताना काॅंग्रेस पक्षनेतृत्वानं राजस्थानमधील उदयपुर येथे चिंतन शिबीर आयोजित केलं आहे. देशभरातील नेते तिथं उपस्थित आहेत.

चिंतन सुरू असतानाच काॅंग्रेसची चिंता वाढणारी माहिती समोर आली आहे. पंजाब काॅंग्रेसचे दिग्गज नेते सुनिल जाखड यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुक लाईव्हद्वारे जाखड यांनी आपला निर्णय पक्षाला कळवला आहे. पंजाबमधील पराभवानंतरच जाखड यांचा राजीनाम्याचा निर्णय झाला होता अशी चर्चा आहे.

पंजाब काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून जाखड यांनी सरकारच्या काळात काम केलं आहे. काॅंग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी असलेल्या मतभेदानंतर पक्षाला जाखड यांनी रामराम ठोकला आहे.

उदयपुरमध्ये अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटी देशभरातील 400 हून अधिक नेत्यांसोबत चिंतन करत असताना जाखड यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला आहे.

दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप जाखड यांच्यावर पक्षातील काही नेत्यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”

 “ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”

 ‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय” 

दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा