शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; ‘या’ सरकारने केली कर्जमाफीची घोषणा

चंदीगढ | पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे.

कर्जमाफीच्या निर्णयाची 10 दिवसात अंमलबजावणी होणार आहे. तसेच सामान्य श्रेणीसाठी आयोग स्थापन करण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. यासंबंधीची माहिती देखील पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांची 5 एकर पर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. तर भूमीहीन मजुरांचे देखील कर्ज माफ केले असल्याचंही मुख्यमंत्री चन्नी यांनी सांगितलं आहे.

पंजाब सरकार कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 हजार कोटी रूपये जमा करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर ही रक्कम येत्या 10 ते 15 दिवसांत पोहोचणार आहे.

कर्जमाफीच्या निर्णयासह भगवत गीता आणि रामायणावर अभ्यास केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय देखील पंजाब सरकारने घेतला आहे. ही अभ्यासकेंद्रे पटियाला येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री चन्नी यांनी दिली आहे.

पंजाबी संगीत आणि चित्रपटाच्या वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी चित्रपट आणि दूरदर्शन परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेची स्थापना 10 दिवसांत केली जाणार आहे.

पंजाब सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 5 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसह भूमीहीन शेतकऱ्यांनादेखील सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे.

2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष जय्यत तयारीसह मैदानात उतरले आहेत.

विरोधकांकडून निवडणुका जिंकण्याची जोरदार तयारी सुरू असताना काँग्रेस देखील सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. त्यात मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपुर्वीच शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल

1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज

फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…

दिलासादायक! रूग्णालयात भरती न होता omicron बाधीतांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त