मनोरंजन

…म्हणून अभिनेता पुष्कर जोगला घालावी लागली बिकीनी!

मुंबई : बिग बॉसच्या घरात अभिनेता पुष्कर जोग चक्क बिकीनी घालून फिरताना दिसतोय. या आठवड्यात स्पर्धेकांना देण्यात आलेल्या टास्कच्या अंतर्गत त्याने ही कृती केली आहे. मात्र यामुळे आता बिग बॉसच्या घरातील वातावरण हलकं फुलकं होण्यास मदत झाली आहे. 

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना बिग बॉसने एक टास्क सोपवला आहे. ‘होऊ दे चर्चा’ असं या टास्कचं नाव आहे. या टास्कच्या अंतर्गत घरातील सदस्यांना असं काहीतरी करायचं आहे ज्यामुळे बातम्या तयार होतील. पुष्करने या टास्कसाठीच बिकीनी घालून घरात वावर सुरु केला आहे. 

घरातील इतर स्पर्धकांमध्ये आऊ आणि शर्मिष्ठाने भांडणं करण्यास सुरुवात केली आहे. आऊने तर चक्क शर्मिष्ठाच्या कानाखाली जाळ काढला आहे. अनेकांना हे भांडण खरं वाटू शकतं. नेहमी काहीतरी हटके करणाऱ्या मेघा धाडेनं कॅमेरामन बननं पसंत केलंय, तर रेशम टिपणीस पत्रकार झाली आहे.

आपल्या जास्तीत जास्त बातम्या कशा होतील हा बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येणार नाही. यातून मोठी भांडणं होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातेय. दरम्यान, सर्व स्पर्धकांना मिळून आपण किती बातम्या केल्या याची क्रमवारी देखील लावायची आहे.  

IMPIMP