‘तो’ अनुभव शेअर करताना पुष्करचे पाणावले डोळे, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेते-अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया आकाऊंट्सवरून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सुरू असलेल्या अनेक घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अशातच मराठी सिनेमासृष्टीचा चॉकलेट बॉय तसेच बिग बॉस मराठी पहिल्या सिझनचा स्पर्धक पुष्कर जोगने आपल्या अभिनयामुळे अनेकांच्या मनात एक वेगळचं स्थान निर्माण केलं आहे. तो सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो.

पुष्कर सतत आपल्या चाहत्यांच्या कॉनटॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी तो कधी-कधी आपले फोटो पोस्ट करतो. तर कधी इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन थेट चाहत्यांशी संवाद साधतो. यातच त्यांनी एक आपला खूप वाईट आणि धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाचा आहाकार माजला आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राणा गमवावे लागत आहेत. अशातच पुष्करने आपला मामा गमावला आहे. काही दिवसांपूर्वी पुष्करला त्याच्या मामाचा कॉल आला होता. मात्र पुष्करला कॉल घेता नाही आला, नंतर घाईगडबडीत त्यांना परत कॉल करायचा राहून गेला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुष्करला काळालं की त्याचा मामा गेला.

कृपा करून आपल्या जवळच्या लोकांचा, मित्रांचा फोन अजिबात टाळू नका. वेळ खूप क्षणभंगुर असल्याचं त्यानी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.  व्हिडीओ शेअर करताना त्यासोबतच पुष्करने सात-आठ ओळींचं कॅप्शनही लिहिलं आहे.

त्यात त्याने ‘मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली. काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याचा पोस्ट मी टाकला होता त्या वेळेस चा मिसड कॉल माझे मन अजून हि खात आहे .. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे. कृपा करून एकमेकांच्या संपर्कांत रहा. लॉक डाऊन असल्या मुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये हे योग्य नाही. हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे तेव्हा हेवे दावे , रुसवे फुगवे , वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार व आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा . कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. लवकरच हा वाईट काळ सरेल आणि आपण सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू.’ असं तो म्हणाला आहे.

तसेच यासोबतच त्याने तुमच्या जवळच्या लोकांची काळजी घ्या, त्यांच्यासोबत बोला, असंही आवाहन केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)


महत्वाच्या बातम्या-

उतवळा नवरा गुडघ्याला बाशिंग! स्वत:च्याच लग्नात नवदेव वाजवू…

स्कुटीवाला अचानक मध्ये आला अन्…, व्हिडीओ पाहून…

कोरोनाबाधित 95 वर्षाच्या आजीने असं काही केलं की, व्हिडीओ…

‘इमेज बनवण्यापेक्षा लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी जडेजा घेतोय मेहनत, पाहा व्हायरल…