‘रूकेगा नही साला’! बॉक्स ऑफिसवर पुष्पाचा धुमाकूळ; हा रेकॉर्ड मोडला

मुंबई | साऊथ इंडियन स्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Pushpa-Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचा चित्रपट ‘पुष्पा द राइज’ (puspa box office collection) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.

पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशातच या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींचा गल्ला जमवून एक इतिहास रचला आहे.

पुष्पाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशीचे कलेक्शन केवळ तीन कोटी होतं, पण तरीही हा चित्रपट 100 कोटींच्या घरात सामील झाला आहे.

याआधी छोटीशी सुरुवात करून हळूहळू 100 कोटींपर्यंतचा प्रवास करणाऱ्या या चित्रपटाचा विक्रमही एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या नावावर होता.

बाहुबली – द बिगिनिंग या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5 कोटी 15 लाखांचा व्यवसाय केला होता, मात्र नंतर हळूहळू तो 100 कोटींवर पोहोचला होता. हाच रेकाॅर्ड आता पुष्पाने तोडल्याचं वृत्त समोर आलं आहे.

पुष्पा – द राइजने खूप आधी 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता, पण आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केलाय.

या चित्रपटात टॉलीवूड अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत आणि जगपती बाबू, प्रकाश राज, धनंजय, अनसूया भारद्वाज, हरीश उथमान आणि वेनेला किशोर चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली आहे.

पहिला भाग हा 17 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. त्याचवेळी, दुसऱ्या भागाचे म्हणजेच ‘पुष्पा द रुल-पार्ट 2’चं शूटिंग या वर्षी सुरू होणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“गरिबांचा गळा किती आवळता…”; संजय राऊतांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

 Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर

क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा 

Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा