नवी दिल्ली | जागतिक महासत्ता असणारे दोन देश सध्या युक्रेनच्या प्रश्नावर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अमेरिका आणि रशियामधील सत्तासंघर्ष वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली असताना पुतिन यांनी मोठी घोषणा केली आहे.
युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असणारा रशिया आता नवीन खेळी करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठी घोषणा करताना युक्रेनमध्ये सैन्य कारवाईचे आदेश दिले आहेत.
युक्रेनमधील पुर्वेकडील दोन प्रांतांना पुतिन यांनी स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती. परिणामी आता युक्रेनच्या भूमिवर रक्तपाताला सुरूवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुर्व युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुंगस्क या प्रदेशांना नवीन राज्य म्हणून मान्यता दिली होती. रशिया युक्रेनवर हल्ला करणार या तयारी बसलेल्या अनेक राष्ट्रांना पुतिन यांच्या या निर्णयानं धक्का बसला आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या दोन्ही प्रदेशांच्या स्वातंत्र्यावर स्वाक्षरी केली आहे. मैत्री, शांतता, सहकार्य या विषयांवर रशिया आणि या प्रदेशांमध्ये संबंध प्रस्थापित होणार आहेत. पण पुतिन आपल्या मतावर ठाम नसल्याचं सैन्य कारवाईवरून लक्षात येत आहे.
पुतिन यांनी युक्रेनवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेला आणखी बळ दिलं आहे. रशियन सैन्य केव्हांही युक्रेनच्या भूमिवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती ती आता खरी ठरली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं आपत्कालिन बैठक बोलावली आहे. नाटो देशांच्या सामर्थ्याला एका प्रकारे रशियानं आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेन प्रश्नावर खलबतं चालू आहेत.
दरम्यान, रशियानं अशाप्रकारचं मोठं पाऊल उचलल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. भारत सरकारनं आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर जगावर तीसऱ्या महायुद्धाचं ढग जमलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख
“येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार”, फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ
माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”
“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता