पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं

मुबंई | रशियानं आता आणखी एका देशाला धमकी दिली आहे. फिनलँडच्या नाटोमधील समावेशाच्या घोषणेवर रशिया चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

नाटो देशांमध्ये सहभागी झाल्यामुळे देशाच्या सुरक्षेत वाढ तर होईलच पण नाटो देखील आणखी मजबूत होईल, असं पंतप्रधान सना मारिन यांनी निवेदनात म्हटलं आहे. या घोषणेवर रशिया चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

फिनलँडनं आता फक्त नाटोमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी आधी अर्ज दाखल करावा लागेल, अशी माहिती आहे.

रशियाच्या सीमेवर नाटोकडून कोणत्या पद्धतीनं विस्तार केला जाईल यावर आमची प्रतिक्रिया अवलंबून असेल आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हयगय केली जाणार नाही, असा थेट इशारा रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. रशिया युक्रेनवर अतिशय आक्रमक हल्ले सुरू आहेत. स

सध्या रशियाने आपला मोर्चा युक्रेनच्या पूर्व प्रांताकडे वळवला आहे. युक्रेनही या रशियाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचं चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून दिलासा 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

‘लक्षात ठेवा त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल’; एमआयएमविरोधात शिवसेना आक्रमक 

 मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानकावर बाॅम्ब सदृश्य वस्तू

 ‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ