पुतिन यांना झालाय गंभीर आजार; तब्येतीमुळे ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मॉस्को | व्लादिमीर पुतीन यांच्यावर लवकरच कर्करोगावरील शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे.

पुतीन यांच्यावरील शस्त्रक्रियेदरम्यान देशाच्या कारभाराची सूत्रं रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाई पेत्रुशेव यांच्याकडे असतील, अशी माहिती आता समोर आलीये.

व्लादिमीर पुतीन यांच्यावर कर्करोगावरील शस्त्रक्रिया होणार असल्याचा दावा टेलिग्राम चॅनेल एसवीआरवर करण्यात आला आहे.

रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयातील सूत्रांनी ही माहिती दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुतीन यांना गेल्या 18 महिन्यांपासून पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सनचा आजार आहे. पुतीन यांनी पहिल्या सर्जरीला उशीर केला होता.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पुतिन यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील बैठकीच्या व्हिडीओमध्ये, पुतिन त्यांच्या खुर्चीत बसून उजव्या हाताने टेबल पकडलेलं दिसत आहे.

ते उजवा पाय जमिनीवर अधूनमधून टेकवत आहेत आणि अस्वस्थ असल्यासारखेही वाटत आहेत.

अधेमधे त्यांच्या हालचाली अनियंत्रित वाटत आहेत. ही एक दूरचित्रवाणी बैठक होती. पुतिन यांच्या या हालचालींवरून त्यांना पार्किन्सन्स डिसिज असल्याच्या अफवा उठल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

8 जागतिक नेत्यांसोबत 65 तास, 25 बैठका; नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यासाठी रवाना 

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रूग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर 

‘भोंगे उतरवण्याने…’; राज ठाकरेंच्या भाषणानंतर आनंद दवेंचं मोठं वक्तव्य 

राज ठाकरेंच्या भाषणावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले… 

भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा, म्हणाले…