Russia-Ukrain War: राष्ट्राध्यक्ष पुतिनच्या गर्लफ्रेंडला हकलून देण्याची जोरदार मागणी

नवी दिल्ली |  जग सध्या युक्रेन-रशिया युद्धाच्या (Russia-Ukrain War) सावटाखाली आहे. रशियन सैन्य काही केल्या माघार घेण्यास सध्यातरी तयार दिसत नाही.

रशिया-युक्रेन युद्धामुळं जगावर अनेक भीषण परिणाम व्हायला सुरूवात झाली आहे. महागाईचा भडका उडत असल्याचा दिसत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैन्याला युक्रेन ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. अशातच पुतिन आणखीन एका कारणानं सध्या चर्चेत आहेत.

पुतिन यांची प्रेयसी प्रसिद्ध आलंम्पियन आलिना कबाइवा सध्या सुरक्षित ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. स्वित्झर्लंडमध्ये एका सुरक्षित ठिकाणी असल्याचा दावा केला जात आहे.

रशिया, बेलारूस, युक्रेन या देशांच्या नागरिकांनी आलियाला स्वित्झर्लंडमधून हाकलून देण्याची मागणी ऑनलाईन मागणी केली आहे. आतापर्यंत तब्बल 50 हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

युद्ध सुरू असताना देखील स्वित्झर्लंड पुतिन यांच्या मैत्रिणीची मदत करत असल्याचा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

अलिना जगातील प्रसिद्ध जिनमॅस्टिकपटू आहे. आलंम्पिकमध्ये अलिनानं 2 सुवर्णपदकं पटकावली आहेत. सध्या अलिना 38 वर्षांची आहे.

दरम्यान, अलिनाला पुतिन यांच्यापासून तीन मुलं असल्याचं म्हटलं गेलं आहे. पण याबाबत अद्यापी कसलीही अधिकृत घोषणा पुतिन यांनी केली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

 बहुप्रतिक्षित OnePlus 10 Pro लवकर बाजारात धडकणार; किंमत पण खूपच कमी

The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”