‘कोणत्याही देशाने हस्तक्षेप केला तर….’; पुतिन यांचा गंभीर इशारा

नवी दिल्ली | रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Putin) यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितलं आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा पुतीन यांनी दिला.

युक्रेनमध्ये बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचं सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने बुधवारी (23 फेब्रुवारी) युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

ही आणीबाणी संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. केवळ रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्कच्या पूर्वेकडील प्रदेश वगळला आहे, याठिकाणी 2014 पासून आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

ही आणीबाणीची स्थिती 30 दिवसांपर्यंत लागू असणार असून यामध्ये देशभरात सुरक्षायंत्रणा अधिक कडक करत वाहन तपासणी तसंच इत्यादी गोष्टी वाढवण्यात येतील. परिषदेच्या या मागणीला लागू होण्यापूर्वूी संसदेची मंजुरी आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, जागतिक महासत्ता असणारे दोन देश सध्या युक्रेनच्या प्रश्नावर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अमेरिका आणि रशियामधील सत्तासंघर्ष वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली असताना पुतिन यांनी मोठी घोषणा केली आहे.

युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असणारा रशिया आता नवीन खेळी करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठी घोषणा करताना युक्रेनमध्ये सैन्य कारवाईचे आदेश दिले आहेत.

युक्रेनमधील पुर्वेकडील दोन प्रांतांना पुतिन यांनी स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती. परिणामी आता युक्रेनच्या भूमिवर रक्तपाताला सुरूवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! युक्रेनमध्ये सैन्य कारवाई करण्याची पुतिन यांची घोषणा 

सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख 

“येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार”, फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ 

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”