नवी दिल्ली | जगातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी राजकारणी म्हणून 21 व्या शतकात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. जगातील महासत्ताक राष्ट्रांना रशियन ताकतीचा परिचय करूण देण्याचा प्रयत्न सध्या पुतिन करत आहेत.
रशियाच्या अगदी शेजारी कुशीत वसलेल्या युक्रेनवर ताबा मिळवण्याचे आदेश रशियन सैन्याला पुतिन यांनी दिले आहेत. रशियन सैन्य जगातील सर्वशक्तिशाली सैन्य मानलं जातं. परिणामी जगात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
युक्रेन-रशिया युद्धाला आता सात दिवस होत आहेत. रशियन सेना युक्रेनच्या राजधानीवर ताबा मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. परिणामी रशियाविरोधात आता अनेक देश युक्रेनला मदत करत आहेत.
पाश्च्यात देशांनी युक्रेनला रशियाविरोधात लढाईसाठी शस्त्रास्त्र पाठवली आहेत. यावरूनच पुतिन संतापले आहेत. या देशांच्या शस्त्रास्त्रांचा वापर रशियाविरोधात झाला तर त्या देशांनी पुढील कारवाईला तयार राहावं, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या रशियन सैन्य आक्रमण करत आहे. लाखोंच्या संख्येनं रशियाचे सैनिक युक्रेनला उद्ध्वस्त करत राजधानी कीवच्या दिशेनं आगेकुच करत आहेत.
रशियन सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत राजधानी कीवचा ताबा घेण्याचा आदेश पुतिन यांनी दिला आहे. परिणामी रशियन सैन्य आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला कीव शहरावर करण्याची तयारी करत आहे.
रशियन सैनिकांच्या आक्रमक हालचालींविरोधात युक्रेनचे सैनिक आपला लढाऊ बाणा दाखवत आहेत. अशात युरोपियन युनियन आणि नाटो देशांनी रशियाला मदत करायला सुरूवात केली आहे.
दरम्यान, नाटो या युद्धात अदयापी प्रत्यक्षपणे उतरली नसल्यानं रशियाच्या ताकतीचा अंदाजा जगाला येत आहे. अमेरिकेनं देखील युक्रेनला फक्त पैशांची मदत केली आहे. प्रत्यक्ष युद्धात उतरण्याचा निर्णय अमेरिकेकडून अद्याप झाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला, म्हणाले…
मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग! बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील म्हणाले…
रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार
“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”