शेवटच्या ओव्हरला राडा! कुलदीप मैदान सोडून निघाल्यावर युझीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

मुंबई | आयपीएलमधील (IPL 2022) 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) या दोन संघात खेळला गेला. अखेरच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा 15 धावांनी पराभव केला.

या सामन्यात शेवटच्या षटकात राडा झाल्याचं पहायला मिळालं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज होती. राॅवमन पाॅवेलने पहिल्या तीन चेंडूत तीन गगनचुंबी षटकार खेचत राजस्थानच्या हार्टबीट्स वाढवल्या.

या षटकातील तिसरा चेंडू हा कमरेच्या वर असल्याने नो अंपायर नो बाॅल देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अंपायरने नो बाॅल दिला नाही. त्यामुळे दिल्लीचे खेळाडू चांगलेच भडकले. कर्णधार रिषभ पंतने वाद घातला.

त्यावेळी रिषभने रागात खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितलं. त्यावेळी पाॅवेल आणि कुलदीप दोघेही मैदान सोडून निघाले. कुपदीपला जाताना पाहताच यजुवेंद्र चहलने कुपदीपला रोखलं आणि बाॅटिंग करण्यास सांगितलं.

दोन वेळा अडवून त्याने कुलदीपला टपली मारत पळ नाॅन स्टाईकला जा, असा सल्ला दिला. मैैत्रीच्या नात्याने त्याने हा सल्ला दिला होता. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, कालच्या सामन्या जाॅस बटलरने मोठी तुफानी खेळी करत या आयपीएल हंगामातील तिसरं शतक झलकावलं. त्याने दिल्लीच्या गोलंदाजांचा धु धु धुतलं होतं.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

समान नागरी कायद्यावर गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“बंटी आणि बबलीने पळ काढला, तुम्ही पळपुटे आहात”

मोठी बातमी! अखेर राणा दाम्पत्याचं आंदोलन मागे; दिलं ‘हे’ महत्त्वाचं कारण

“उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”

  ‘मुख्यमंत्र्यांवर किती हल्ले झाले तरी त्यांनी….’; सुप्रिया सुळेंकडून कौतुकांचा वर्षाव