Top news देश राजकारण

राजधानीत राडा! शेतकऱ्यांना पाठींबा दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं आपच्या आमदाराचं ऑफिस; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत आज मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या आमदाराचं ऑफिस तोडल्याची घटना आज दिल्लीत घडली आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार तथा दिल्लीतील जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चड्ढा यांच्या ऑफिसची आज भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. राघव चड्ढा यांनी स्वतः ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच चड्ढा यांनी या ट्वीटसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यालयाची तोडफोड केली असून माझ्या सहकार्यांना देखील मारहाण केली आहे. त्यामुळे माझे सहकारी घाबरले आहेत, असं ट्वीट चड्ढा यांनी केलं आहे.

राघव चढ्ढा तुमचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समजावून सांग, शेतकऱ्यांची बाजू घ्यायचं बंद करा, अन्यथा एक एक करत आम आदमी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आम्ही असाच धडा शिकवू, असं देखील भाजप कार्यकर्त्यांनी म्हटल्याचं चड्ढा यांनी सांगितलं आहे.

चड्ढा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अद्याप भाजप नेत्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशातील अनेक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेले हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचं शेतकऱ्यांच म्हणनं आहे. याच कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठिय्या मांडून आहेत.

जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. गरज पडल्यास आपण सहा महिने इथेच राहू असं देखील आंदोलनातील शेतकरी सांगत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘KBC’तील एक कोटी फक्त नावालाच, वाचा करोडपती होणाऱ्या स्पर्धकाला किती रुपये मिळतात?

सोन्याची झळाळी पुन्हा उतरली, वाचा आजचा सोन्याचा भाव

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीवरंच कारखान्यातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

अबब! ‘या’ शहरात सापडला तब्बल 99 हजार किलो सोन्याचा खजिना, किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

फडणवीस यांनी चक्क ठाकरेंना दिल्या पुढील 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा म्हणाले…