‘मिसेस श्रीलंका’च्या मंचावर राडा! विजेतीचा मुकूट हिसकावत केलं जखमी; पाहा व्हिडीओ

कोलंबो | कोणत्याही महिलेसाठी त्या देशातील सौंदर्यवतीचा पुरस्कार मिळवणं ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, या सौंदर्यवतींच्या स्पर्धांमध्ये वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अशीच काहीशी घटना ‘मिसेस श्रीलंका 2021’ च्या मंचावर घडली आहे.

‘मिसेस श्रीलंका 2021’च्या मंचावर चक्क हाणामारीचा प्रकार घडला आहे. या स्पर्धेची विजेती ठरलेल्या महिलेचा मुकुट काढून दुसऱ्या महिलेला घालण्यात आला. यामध्ये विजेती स्पर्धक देखील जखमी झाली. यामुळे या स्पर्धेवर सर्व स्तरांमधून टीका केली जात आहे.

‘मिसेस श्रीलंका 2021’च्या स्पर्धेत अनेक सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. यातील 3 स्पर्धक अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचल्या. यामध्येच पुष्पिका डिसिल्वा देखील होता. या स्पर्धेचा अंतिम टप्पा झाल्यानंतर पुष्पिका डिसिल्वा यांना मिसेस श्रीलंका म्हणून गौरवण्यात आलं.

पुष्पिका डिसिल्वा यांना मंचावर मनाचा ताज देखील घालण्यात आला. यावेळी मंचावर ‘मिसेस श्रीलंका 2019’ची विजेती कॅरोलिन जुरी आली आणि तिने पुष्पिका यांच्या डोक्यावरून मुकुट काढून घेतला.

कॅरोलिन जुरीने ज्यावेळी पुष्पिका डिसिल्वा यांच्या डोक्यावरून मुकुट उतरवला, त्यावेळी त्यांच्या डोक्याचे केस खेचले गेले. यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत देखील झाली. या घटनेनंतर पुष्पिका रडत रडत मंचावरून खाली गेल्या. पुष्पिका यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पुष्पिका यांच्या डोक्यावरचा मुकुट काढण्याचं कारण सांगताना कॅरोलिन जुरी म्हणाली की, पुष्पिका डिसिल्वा ही एक घटस्फोटीत महिला आहे. तिला मिसेस श्रीलंकाचा किताब देणं योग्य नाही. यामुळे हा किताब फर्स्ट रनर अप ठरलेल्या सौंदर्यवतीला देण्यात येत आहे.

हा कार्यक्रम कोलंबोमध्ये चालला होता. जगभरातील लोक हा कार्यक्रम लाईव्ह पाहत होते. भर मंचावर ही सर्व घटना क्षणार्धात घडली होती. आयोजकांनी याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. यामुळे हे सर्व घडल्यानंतर आयोजक देखील हैराण झाले.

या घटनेनंतर आयोजकांनी पुष्पिका डिसिल्वा यांची माफी मागितली. त्यानंतर मिसेस श्रीलंकाचा किताब आणि मुकुट सन्मानाने पुष्पिका यांना परत करण्यात आला. तसेच याप्रकरणी तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असं देखील आयोजकांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

लग्नात नवरी निघाली नवदेवाची हरवलेली बहीण, पाहा नेमकं काय घडलं?

कार्तिक आर्यनने घेतलेल्या ‘लॅम्बोर्गिनी’समोर असं काही केलं की…, पाहा व्हिडीओ

राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे…

कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट…

हाय गर्मी! ‘टकाटक’ गर्लच्या या लूकने चाहते…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy