“मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नाहीत, मग कारभार काय फेसबुकवरून चालणार का?”

अहमदनगर |   कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?, अशी विचारणा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही, असं सांगत केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.

शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान द्यावं, शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्याच्या विकासात परप्रांतियांचादेखील वाटा आहे. मात्र राज्य सरकारकडून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही, असं ते म्हणाले. तर धवानचा बागबान कोण? या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र अमिताभ गुप्तांना क्लिनचिट दिली गेली, असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी… दिली शेंबड्या पोराची उपमा