अहमदनगर | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. अद्यापही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात येणार नाही तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारला दोन वर्षे झाली आहेत. ‘या सरकारचा किमान-समान कार्यक्रम म्हणजे वसुलीचा कार्यक्रम आहे’, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे
रोज मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. यांना जनाधार मिळाला नव्हता. मात्र, वसुली करण्यासाठी यांचा समान-किमान कार्यक्रम सुरू आहे. हे सरकार लोकांच्या केलेल्या फसवणुकीमुळेचं पडेल, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
सरकार तुमचं आणि आरोप भाजपवर, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानावर का गेला नाही? असा सवाल उपस्थित करत विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले आहे.
तुम्ही स्वत:ला काँग्रेसी नेता समजतात ना? बोलवा बैठक आणि घ्या निर्णय, असं आव्हान त्यांनी काँग्रेस नेत्याला दिलं आहे.
यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही कडाडून टीका केली आहे. अनिल परब यांना मुंबईत केबल कनेक्शन दिल्यासारखं एसटीचं काम सोपं वाटतं का?असा प्रश्न करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनिल परब यांना जोरदार टोला लगावला आहे.
अनिल परब यांनी एसटीमधून प्रवास केलाय का ? असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या कुटूंबाचा आक्रोश पाहिल्यानंतर मंत्र्यांच्या आरत्या ओवाळायच्या का? असे प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
तसेच मी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करतो, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. परिवहन मंत्री मीडियासमोर येऊन रोज बोलत आहेत. परंतु, त्यांच्या बोलण्याला कोणताच आधार नाही, अशी टीका विखे पाटलांनी केली.
आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कामगारांची बाजून घेतली असती, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातल्या अनेक नेत्यांना अनिल देशमुख यांची पाठराखण करायला वेळ आहे.
मात्र, एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना वेळ मिळत नाही, ही राज्याची शोकांतिका आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गहलोतच राजस्थानचे पायलट! राजस्थान काॅंंग्रेसचा कलह संपला
“उगाच माथी भडकाऊ नयेत, फडणवीसांनी थोडा संयम बाळगायला हवा”
विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी! प्रमोद महाजन यांची जागा घेणारे दुसरे नेते ठरले तावडे
“कंगणाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही पद्मश्री व्हायचंय दिसतंय”
“हरबल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा”