मुंबई | आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसकडून भाजप (Bjp) नेत्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. सत्तेत राहुनही काँग्रेसला कोणी विचारत नाही. एखाद्या पक्षाने किती लाचारी पत्करावी. काँग्रेसला चार-दोन खाती मिळाली, त्यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा घणाघात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसवर केला आहे.
कोणत्या तत्विक धोरणावर आज काँग्रेस काम करतेय? सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारणार? उत्तर भारतीयांवर अन्याय करणाऱ्या शिवसेनेबरोबर आज तुम्ही सत्ता भोगताय. मात्र उत्तर प्रदेशात वेगळी चूल मांडत आहात. काँग्रेसचा राजकीय प्रवास कोणत्या दिशेला चाललाय? याचं तरी काही भान आहे का?, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत हे करमणुकीचं केंद्र झालंय. त्यांचं बोलणं कोणीही आता गांभीर्याने घेत नाही. त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करण्यापलिकडे काही नाही, असंही ते म्हणालेत.
शिवसेनेमध्ये संजय राऊत एकाकी पडले आहेत. एकाकी पडल्याने सेनाभवनाचा आधार घेत आहेत. ते वाईन कंपनीत भागीदार असल्याचं आता लपून राहील नाहीय. अनेक प्रकरणाचे फास आता संजय राऊत यांच्याभोवती आवळले जात आहेत. आपल्यावर कारवाई होणार आहे, यासाठी त्यांची आगपाखड सुरु आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात नेमके काय दिवे लावले ते एकदा संजय राऊतांनी जाहीर करावं. राज्य सरकारची वकिली करण्यासाठी संजय राऊतांना रोज पुढे केलं जातंय, असं ते म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांवरच आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भविष्यात मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहेत. आपल्यावर राजकीय हेतूने कारवाई होतेय हे दाखवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न आहे, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘राजकारणात जो आपला विरोध करतो तो ही उद्या…’; राज्यपालांचं मोठं वक्तव्य
“त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो तर धन्य झालो असतो”
धनंजय मुंडेंची बॅटिंग पाहिली का?, 157च्या स्ट्राईक रेटनं खेचल्यात धावा; पाहा व्हिडीओ
“शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, एप्रिलमध्ये वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा”
सीमेवर लढताना अवघ्या 23 व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण; संपूर्ण देश हळहळला