“काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”

मुंबई | पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यापासून राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या.दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी विदेशात राहून राजकारण कसं करता येईल? असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्ला चढवला होता.

ममतादीदींनी थेट पवारांसमोरच यूपीएचं अस्तित्व नाकारलं. परदेशात राहून राजकारण होते का?, असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी राहुल गांधी यांच्या बाबत केलं होतं, त्यावर अजूनही राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावरून भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

ममता बनर्जींच्या विधानाने काँगेसला स्वतःचे विसर्जन करण्याची वेळ आली आहे. एवढं होऊनही काँग्रेसचे लोक सत्तेत का टिकून आहेत ? असा सवाल विखे-पाटलांनी विचारला आहे. तसेच काँग्रेसवर ओढवलेली नामुष्की पाहताना दुःख होतंय असंही विखे-पाटील म्हणालेत.

काँग्रेस नेत्यांनी काढलेली पत्रके स्व. विलासराव देशमुखांच्या काळातली आहेत. पत्रके काढताना यांनी स्वतःची अक्कल देखील गहाण ठेवली, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस नेत्यांचा समाचार घेतला आहे.

सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच ही मंडळी सत्तेला चिटकून बसली आहे. पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्वाबद्दल अवमानकारक गोष्टी घडत आहेत, अशावेळी काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल अशी अपेक्षा होत, असंही विखे पाटील म्हणालेत.

दरम्यान, भाजपासारख्या विभाजनवादी शक्तीविरोधीत एकत्रित लढा देणे ही काळाची गरज असताना काही लोक भाजपला मदत होईल अशी भूमिका घेत आहेत. 2019 च्या निवडणुकीतही असाच प्रयत्न केला गेला ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच झाला होता, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.

हुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी या सातत्याने केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात आक्रमपणे लढा देत आहेत. शेतकरी, कामगार, दलित, पीडित समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Omicron पासून बचावासाठी WHO ने जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना! 

दक्षिण आफ्रिकेत सर्वात वाईट परिस्थिती; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर 

“मग एसटी कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का?” 

कुठेही प्रवास केला नाही तरी झाला Omicron; धक्कादायक बातमीनं देशाचं टेन्शन वाढलं! 

Omicron विरुद्ध ‘ही’ लस ठरु शकते अधिक प्रभावी; भारताला मोठा दिलासा