महाराष्ट्र मुंबई

नगरची जागा न सोडणं अंगलट; राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात विखेंचा मोठा वाटा

मुंबई |  अहमदनगर लोकसभेची जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत खडाजंगी झाली. राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी बंड करत खासदारकीचं तिकीट मिळवलं. आणि झालेल्या मानहानीची सव्याज परतफेड करत खासदार बनले. राधाकृष्ण विखे पण फार काळ काँग्रेसमध्ये रमले नाहीत. लोकसभा निकालानंतर महिन्याभरातचं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अन् त्यांनीही राष्ट्रवादीचा बदला घ्यायचा चंग बांधला. आणि त्याचीच प्रचिती आज राष्ट्रवादीला लागलेली गळती…! विखेंच्या मदतीने हे पक्षांतर झाल्याची चर्चा आहे.

 आमदार वैभव पिचड, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, मुंबईच्या वडाळ्याचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन या चार आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. या नेत्यांच्या भाजप प्रवेशात विखेंनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं बोललं जातंय.

भाजपात प्रवेश करतावेळी आघाडीतले अनेक नेते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं विखे म्हणाले होते. त्यांचं हेच वक्तव्य आता खरं होताना दिसून येत आहे.

राधाकृष्ण विखेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात आणण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावली असल्याच्या चर्चा आहेत.

अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला म्हणजे विखेंना सोडली नाही. त्या जागेवर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचाही निभाव लागला नाही आणि आता पक्षातले आमदार आणि स्वत: संग्राम जगताप पक्षाला धक्का देणार आहे, असं एकंदरित चित्र आहे. ‘तेलंही गेलं आणि तूपही गेलं’ अशी म्हणण्याची वेळ आता राष्ट्रवादीवर आलीये का? अश्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-होय… खेकडे धरण फोडू शकतात!- आदित्य ठाकरे

-अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात ‘शिवस्वराज्य’ यात्रा; उदयनराजे असणार ‘स्टार कॅम्पेनर’!

-“ओव्हरफ्लो झालेलं जहाज बुडतं हा नियम आहे… भाजपचं जहाज नक्की बुडणार”

-“तोंडातून फेस येईपर्यंत ज्यांच्यावर टीका केली… आज त्यांच्याच कळपात प्रवेश केला”

-आघाडीच्या नेत्यांना कसं फोडलं??? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गुपित रहस्य!

IMPIMP