‘अजितदादा परत आमच्यासोबत या’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मुद्दे गाजत आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपने मुसंडी मारली व सहावी जागा खिशात घातली.

भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीत सध्या राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. त्यात भाजप नेत्याने राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपात येण्याती थेट ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना भाजपसोबत येण्याचं आमंत्रणच दिलं आहे. विखे पाटलांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

पुष्कर श्रोत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत घेतली. यावेळी विखे पाटलांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांबद्दल बोलताना विखे पाटलांनी अजित पवारांना भाजपसोबत येण्याचा सल्ला दिला आहे.

अजित पवार स्पष्टवक्ते आहेत. त्यांची कमिटमेंट आहे, अशा शब्दात विखे पाटलांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. तर अजितदादा परत आमच्यासोबत या, असं म्हणत विखे पाटलांनी अजित पवारांना भाजपात येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

अजित पवारांना माझा एवढाच सल्ला आहे की आता परत तुम्ही बरोबर या. बरोबर या एवढाच सल्ला मला त्यांना द्यायचा आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांचं कौतुक करत त्यांना भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही विखे पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटलांचं हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं दरेकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

मोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज घेताना अटक

तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय ‘इतक्या’ जागा भरणार

“हातात ईडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते, तुम्हाला तर…”

“महाविकास आघाडीला विधानपरिषद निवडणुकीत मोठं खिंडार पडेल”