महाराष्ट्र मुंबई

भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे पाटलांनी पहिल्यांदा सेनेवर साधला निशाणा! म्हणाले…

मुंबई |  गेल्या महिन्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून मंत्रीपद मिळवलं. अन् त्यानंतर त्यांनी आज युतीत सहभागी असणाऱ्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबईत कोसळलेल्या इमारतीवरून त्यांनी शिवसेनेना लक्ष्य केलं आहे.

कोसळलेल्या इमारतीस जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्यांनी मुंबई महानगरपालिकने याअगोदरच खरंच यावर कारवाई करायला हवी होती, असं म्हणत सेनेवर निशाणा साधला आहे.

घडलेल्या घटनेला दोषी कोण आहेत याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्ता प्राथमिकता आहे ती अडकलेल्यांना बाहेर काढणं आणि त्यांना मदत करणं, असं विखे पाटील म्हणाले.

मुंबई येथील डोंगरी परिसरामध्ये कौसरबाग नावाची चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली 13 लोकं मृत पावले असून 40 ते 50 रहिवासी अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचाव कार्यास सुरवात करण्यात आली आहे.

डोंगरीच्या तांडेल स्ट्रीटवरील अब्दुल हमीद दर्गा येथे ही दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना दुपारी 12 वाजून 10 मिनीटांच्या सुमारास घडली असल्याचं समजतंय. दरम्यान, कोसळलेली इमारत जूनी असून याआधीही या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

कोसळलेली म्हाडाची इमारत 100 वर्ष जूनी होती. मात्र अतिधोकादायक नव्हती. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीमध्ये याचा समावेश नव्हता, असं म्हणतं जखमींना योग्य मदत देण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

IMPIMP