देश मनोरंजन

बिग बॉसच्या सर्वात महागड्या स्पर्धकांमध्ये राधे माँ; रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!

नवी दिल्ली | बिग बॉसच्या १४ व्या पर्वात राधे माँ यांचा महिमा पाहायला मिळणार आहे. देशभरात त्या राधे माँ म्हणून प्रसिद्ध आहे. आता बिग बॉसच्या कॅमेराने राधे माँ यांचा कोणता अवतार कॅमेरात कैद केला आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहे.

सोशल मीडियावर राधे माँ यांच्या फीबाबत बिग बॉसच्या फॅन क्लबबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या फॅन क्लबनुसार, १४ व्या पर्वातील सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या स्पर्धकांपैकी राधे माँ या एक आहे. राधे माँ यांना किती पैसे दिले जातात, हे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.!

राधे माँ यांना दर आठवड्याला २५ लाख रुपये दिले जात आहे. आता या गोष्टीत किती सत्यता आहे, हे राधे माँ आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांनाच माहित असेल. पण राधे माँ यांच्या फीबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तशाही सोशल मीडियावर राधे माँ आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहे आणि काही कारणांमुळे त्या नेहमी चर्चेतही असतात. आता बिग बॉसमुळे सोशल मीडियावर राधे माँ जबरदस्त प्रसिद्ध आहे. राधे माँ बिग बॉसमध्ये येणार आहे, हे त्यांच्या चाहत्यांना समजल्यावर ते खूपच आनंदी झाले आहे.

पण काहींनी राधे माँ यांच्या संदर्भात काही विनोदही केले आहे. त्यांचे सध्या काही मिम्सही शेअर होत आहे. कार्यक्रमाचे निर्माते काही वर्षांपासून राधे माँ यांना कार्यक्रमात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यानंतर आता राधे माँ अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

१४ व्या बिग बॉस पर्वातील राधे माँ या ट्रेंडिंग स्पर्धक ठरणार आहे. पंजाबच्या गुरदासपूरमधील असणाऱ्या राधे माँ यांचे संपूर्ण देशभरात अनेक भक्त आहे. मुंबई आणि पंजाब सारख्या शहरांमध्ये त्यांचे सत्संग होतात.

राधे माँ यांचे काही सेलिब्रिटींसोबतचे फोटोही समोर आले आहे. काही सेलिब्रिटीही राधे माँ यांचे भक्त आहे. कलर्स वाहिनीने राधे माँ यांच्या प्रवेशाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण त्यात त्यांचा पूर्ण चेहरा दाखवण्यात आला नाही.

पण राधे माँ यांचा त्रिशूल, त्या घालत असलेला लाल ड्रेस आणि कपाळावर असलेल्या लाल गंध लावलेला आहे. यावरून समजत की, राधे माँ या कार्यक्रमात येणार आहे. ३ ऑक्टोबरपासून बिग बॉस सुरू होणार आहे. या १४ व्या बिग बॉसच्या पर्वात या वेळी टीव्ही क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

करण जोहरसह डझनभर कलाकारांचं टेंशन वाढलं, ‘या’ प्रकरणात नव्याने होणार चौकशी?

भारताचा ‘हा’ युवा खेळाडू तळपला; विराट-रोहितचा तुफानी फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला

तो अशक्यप्राय विजय कसा मिळवला???; दिनेश कार्तिकनं सांगितली राज की बात!

महिंद्राने लाँच केली बहुचर्चित SUV थार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

सुशांत-दिशा प्रकरणी अमित शहांचं नितेश राणेंना पत्र; पत्रात म्हणाले…