Top news मनोरंजन

…मी फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी लग्न केलं; राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा

मुंबई | अभिनेत्री राधिका आपटे माहित नाही असं कोणीही सिनेशौकिनांमध्ये आढळणार नाही, आपल्या अभिनयाच्या जोरावर तीने आपलं एक स्वतंत्र अस्तित्व तयार केलं आहे. मात्र यासोबतच राधिका आपटे आपल्या वादग्रस्त गोष्टींमुळे कायमच चर्चेत राहात असते, आपल्या बिनधास्त वागण्या-बोलण्यामुळेही ती चर्चेत राहात असते.

राधिका आपटेचा एक इंटरव्ह्यू नुकताच घेण्यात आला आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीने राधिकाला काही प्रश्न विचारले आहेत, तर राधिकाने विक्रांतला काही प्रश्न विचारले आहेत. जनरली याआधीच्या मुलाखतींमध्ये त्यांना कुणीच कधीही न विचारलेले हे प्रश्न आहेत. यामधील एका प्रश्नाच्या उत्तरात राधिकाने धक्कादायक खुलासा केला आहे.

विक्रांतने राधिकाला तिच्या लग्नासंदर्भात प्रश्न केला होता. राधिकाने लग्न का केले?, असा तो प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देताना राधिका जे म्हणाली आहे त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, मात्र फक्त आणि फक्त व्हिसा मिळवण्यासाठी आपण लग्न केल्याचं राधिका आपटेनं कबुल केलं आहे.

राधिकाने 2012 साली ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं आहे. सध्या ती बेनेडिक्टसोबतच लंडनमध्ये राहात आहे. त्याच्यासोबत ती भरपूर मज्जा करत आहे. मात्र आपण केवळ व्हिसा मिळवण्यासाठी लग्न केल्याचं तीनं म्हटल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

राधिका याच प्रश्नवर बोलताना म्हणाली की लग्नासारख्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. मी लग्न करण्यासाठी जन्माला आलेली व्यक्ती नाही. मला आणि बेनेडिक्टला एकत्र रहायचं होतं. मात्र सोबत रहायचं असेल तर त्यासाठी व्हिसा असणं गरजेचं होतं आणि लग्न केल्याशिवाय तो मिळणं फार अवघड होतं.

राधिका पुढे म्हणते की, या सगळ्यावर एक उपाय मला समजला, लग्न केल्यावर लगेच व्हिसा मिळतो असं मला कळालं. त्यामुळे मी बेनेडिक्टसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

राधिका आपटे सध्या ब्रिटनमध्ये बेनेडिक्टसोबत वेळ घालवत आहे. तीने यावर्षी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. तीनं यावर्षी खाण्यापिण्यावर जोर दिला आहे. तसेच ती व्यायामालाही वेळ देत आहे.

राधिका या वर्षी या स्वतःसाठी काढलेल्या सुट्टीत काही गोष्टी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आराम करण्यासोबतच थोडेफार लिहिण्याचा सराव तीने केला आहे, तसेच वाचन व सिनेमे, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, वेबसीरिज यासारख्या गोष्टी देखील ती पाहात आहे.

राधिका आपटे मराठमोठी अभिनेत्री आहे, मात्र मराठी सिनेमांसोबतचं तीने हिंदी सिनेमांमध्ये देखील आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आता सध्या वेबसीरिजचा जमाना असल्याचं दिसतं. या फॉर्ममध्ये ती चपखल बसली असून सॅक्रेड गेम्ससारख्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजमध्ये ती प्रमुख भूमिकेत झळकली होती.

राधिका आपटेचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सोबतचा रात अकेली है हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. कायम यश मिळत असलं तरी या अभिनेत्रीच्या प्रसिद्धीला नेहमीच वादाची किनार लाभलेली आहे.

आताही तीने आपल्या या मुलाखतीतून नवा वाद ओढवून घेतल्याचं दिसत आहे. फक्त व्हिसा मिळवण्यासाठी लग्न केल्याचं तीनं म्हटलं आहे. यामुळे तीच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

अभिनेता विक्रांत मेस्सीने विचारलेल्या या प्रश्नाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेस्सीने स्वतःच्या सोशल मीडिया खात्यांवरही हा व्हिडीओ टाकला आहे.

पाहा राधिकाचा तो व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

Say hello to Netflix’s new Massey-iah. #VikFlix @netflix_in @radhikaofficial

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey87) on

महत्त्वाच्या बातम्या-

पक्षांतर करताच कोणी किती भूखंड घेतलेत असं म्हणत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा!

एकनाथ खडसे यांच्यासह ‘या’ 72 नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश!

भाजपला मोठं खिंडार! भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पत्नीसह दोन माजी आमदार खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सुशांत प्रकरणी हृतिक रोशनच्या आईनं मौन सोडलं! सुशांतबद्दल संभ्रमात टाकणारी पोस्ट करत म्हणाल्या…

पक्षांतर करताच कोणी किती भूखंड घेतलेत असं म्हणत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा!