मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक बडे कलाकार सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. राज कुंद्रा प्रकरण समोर आल्यापासून नेटकरी अनेक कलाकारांचे जुने व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल करत त्यांना ट्रोल करत आहेत. अशातच आता मराठी अभिनेत्री राधिका आपटे देखील तिच्या एका जुन्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
सध्या सोशल मीडियावर राधिकाचा एक न्यूड सीन व्हायरल होत आहे. ‘पाचर्ड’ या चित्रपटातील हा सीन आहे. या सीनचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल करत काही युजर्स राधिकाचा संबंध थेट राज कुंद्रा प्रकरणाशी जोडत आहेत.
तसेच काही युजर्स राधिकावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील करत आहेत. सध्या ट्वीटरवर #BoyCottRadhikaAapte असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. आतापर्यंत जवळपास 25 हजारांहून अधिक लोकांनी हा हॅशटॅग वापरला आहे.
राधिकाने आपल्या संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप नेटकरी तिच्यावर करत आहेत. याच सीनमुळे यापूर्वी देखील राधिका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. त्यावेळी देखील नेटकऱ्यांनी राधिकावर गंभीर आरोप केले होते.
2016 मध्ये राधिका पाचर्ड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटामध्ये आधिल हुसैनने मुख्य अभिनेता म्हणून भूमिका साकारली होती. चित्रपटात राधिकाने न्यूड सीन दिला होता. याच सीनवरुन आता नेटकरी राधिकाला ट्रोल करत आहेत.
दरम्यान, राधिका आपटे एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. राधिका नेहमीच आपलं मत परखडपणे मांडत असते. तिने मराठी चित्रपटांबरोबरच अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
राधिकाने अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. न्यूड सीनची ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी देखील तिला खूप ट्रोल केलं होतं. त्यावेळी राधिकाने यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली होती.
महत्वाच्या बातम्या –
हनी सिंगच्या पत्नीचा सासऱ्यावर धक्कादायक आरोप! म्हणाली, नशेत त्यांनी माझ्या स्तनांना…
प्रेग्नंसी दरम्यानचा ‘सेक्स लाईफ’बद्दल करीनाचा मोठा खुलासा; म्हणाली, त्यावेळी सैफ खूप…
कौतुकास्पद! आयसीयूमध्ये अभ्यास करत शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर
माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ
अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत