मुंबई | मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे माहित नाही असं कोणीही आढळणार नाही, आपल्या अभिनयाच्या जोरावर राधिकाने आपलं एक स्वतंत्र अस्तित्व तयार केलं आहे. मात्र यासोबतच राधिका आपटे आपल्या वादग्रस्त गोष्टींमुळे कायमच चर्चेत रहात असते, आपल्या बिनधास्त वागण्या-बोलण्यामुळेही ती चर्चेत असते. सध्या राधिका भलत्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.
नुकतंच राधिका तिच्या बोल्ड फोटोमुळे ट्रोल झालेली पाहायला मिळाली होती. याशिवाय ‘#BoycottRadhikaApte’ हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करत असल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच बाॅयकाॅट झाल्यानंतर पुन्हा एकदा राधिका आपटेचा एक बोल्ड अवतार पाहायला मिळाला आहे.
सोशल मीडियावर राधिकानं बोल्ड फोटो शेअर केले आहे. राधिकाच्या या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. तिनं व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये बिकनीतील नवा आणि सेक्सी लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. राधिकाचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. राधिकाच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राधिकाने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून त्यावर एक लेदर जॅकेट घातलंय. यासोबतच तिने गळ्यात एक गोल्डन नेकलेस घातला आहे. राधिकाचा हा ग्लॅमरस लूक चांगलाच व्हायरल होतोय.
राधिकानं हा लूक जितक्या बिनदास्तपणे हाताळला आहे ते पाहता एक अभिनेत्री आणि एक मॉडेल म्हणून तिचं चाहत्यांनी कमालीचं कौतुक केलं आहे. तिला पाहून ‘मनी हाईस्ट’ या वेब सीरिजमधील ‘नैरोबी’ या पात्राची आठवण काढली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोत राधिका ‘मनी हाइस्ट’ वेब सीरिजमधील नैरोबी सारखी दिसत आहे अशा कमेंट्सही केल्या आहेत.
आता सध्या वेबसीरिजचा जमाना असल्याचं दिसतं. त्यामुळे राधिका अनेक वेबसिरिजमध्येही झळकली आहे. ‘नेटफ्लिक्स गर्ल’ अशी ओळख झालेल्या राधिकानं रुपेरी पडद्यासोबतच ऑनलाईन सीरिजच्या दुनियेतही तिच्या अभिनयांचं भरभरुन कौतुक होत असतं.
राधिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पाहायला मिळते. ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
महत्वाच्या बातम्या –
बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उलटी उडी मारली अन्…; पाहा व्हिडीओ
दीपिका लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? परिणिती चोप्रा म्हणाली…
‘शेरशाह’ चित्रपटासाठी सिध्दार्थने घेतलं तब्बल ‘इतके’ कोटी रुपये मानधन
…म्हणून नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावर डोकं ठेवलं; पाहा व्हिडीओ
हॉट सीन करताना मी प्रचंड घाबरले मग बॉबीने…; ‘आश्रम’ वेबसिरीजमधील अभिनेत्रचा खुलासा!