लखनऊ | कारागृहातील कैद्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी बुलंदशहर कारागृह प्रशासनाने जेलमध्ये रेडिओ स्टेशन तयार केलं आहे. तसेच हे रेडिओ स्टेशन चालवलं देखील जातं.
तुरंगातील रेडिओ स्टेशनमध्ये कैदी हे रेडिओ जॉकी आहेत आणि इतर कैद्यांची आवडती गाणी सुद्धा यावर ऐकवली जातात. हे रेडिओ स्टेशन तुरूंगातील कैद्यांच्या मनोरंजनाचे केंद्र आहे.
जिल्हा कारागृहात रेडिओ स्टेशन सुरू करण्याचं तुरूंग प्रशासनाचे उद्दीष्ट कारागृहातील कैद्यांना तणावापासून मुक्त ठेवणं हे आहे. तुरुंगातील ताब्यात घेतलेले कैदी बाह्य जगाशी संपर्क गमावतात आणि अशात ते कुटुंबाची आठवण काढतात. त्यांचा हा तणाव दूर करण्याच्या हेतूने हे रेडिओ स्टेशन तयार केले गेलं आहे, असं जेल अधीक्षक ओ.पी. कटियार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रेडिओद्वारे वेळोवेळी कैद्यांना देशाचा इतिहास, धार्मिक ज्ञान आणि ऐतिहासिक इतिहास मिळेल, वारसा माहितीही दिली जाईल. ज्याद्वारे तणाव कमी करण्यासाठी, कैद्यांचे ज्ञान देखील वाढवता येते, असं ओ.पी. कटियार यांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
ते परत आले पण ‘विरोधी पक्षनेता’ म्हणून- जयंत पाटील-https://t.co/satng0HIUO @Dev_Fadnavis @bjp4mumbai @NCPspeaks @JayantPatilFC @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“मी इथं येईन असं म्हणालो नव्हतो तरी इथं आलो” – https://t.co/9afDPFr6Yd @OfficeofUT @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
प्रत्येक वाक्याला अध्यक्ष महोदय म्हणायलाच हवं का?; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला – https://t.co/GIw10LuLaf @OfficeofUT @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019