देश

भारतीय वायुसेनेसाठी राफेल विमान गेमचेंजर ठरेल- आर. के. एस. भदौरिया

पॅरिस : ज्या राफेल विमानावरुन संपूर्ण देशात गदारोळ झाला, ते राफेल विमान लवकरच फ्रान्समधून भारतात आणले जाणार आहे. त्यापूर्वी एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी राफेल विमानातून भरारी घेतली.

राफेलमध्ये ज्या प्रकारे तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. हे भारतासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे, असं भदौरिया यांनी सांगितलं आहे.

राफेल विमान भारतासाठी युद्धपातळीवर मोलाचे ठरेल. वायुसेनेत सुखोईसोबत राफेल विमान ही तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानसाठीच नव्हे तर इतर कुठल्याही देशांसाठी डोकेदुखी ठरतील, असं भदौरिया यांनी म्हणाले.

राफेलमधून उड्डाण करणे हा खूपच सुखद अनुभव होता. यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. या अनुभवानंतर आपल्या लढाऊ विमानांच्या ताफ्यातील सुखोई–30 सोबत राफेल किती फायदेशीर ठरणार हे तपासणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली.

आपण ज्या प्रकारे कारवाया आणि पुढील काळातील युद्ध सज्जतेसाठी तयारी करत आहोत, त्या हिशोबानं राफेल हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. असंही भदौरिया यांनी सांगितले.

IMPIMP