रहाणेचं नाव ‘अजिंक्य’ कसं पडलं?; वडिलांनी सांगितला गमतीदार किस्सा

मुंबई | भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नेहमीच त्याच्या उत्तम खेळीमुळे चर्चेत असतो. नुकतंच भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात देखील अजिंक्यने उत्तम खेळी केली. मात्र, या लोकप्रिय खेळाडूच नाव अजिंक्य कसं पडलं? यामागील गंमतीशीर किस्सा अजिंक्यच्या वडिलांनी सांगितला आहे.

अजिंक्यचे वडील मधुकर रहाणे यांनी नुकतीच एका वृत्त माध्यमाला विशेष मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी अजिंक्यचं नाव कसं ठेवलं गेलं? यामागील एक किस्सा सांगितला आहे.

अजिंक्याच्या नावाबाबत बोलताना त्याचे वडील मधुकर रहाणे म्हणाले की, अजिंक्यचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रमेश देव यांचा मुलगा चांगली कामं करत होता. त्याचे नाव अजिंक्य होते आणि ते आम्हाला खूप आवडत होते. त्यामुळे आम्ही देखील आमच्या मुलाचे नाव अजिंक्य ठेवायचे ठरवले.

अजिंक्य हे नाव ठेवण्यामागे खास असा हेतू कोणताच नव्हता. मात्र, त्यावेळी आम्हाला हे नाव फार आवडले होते. त्यामुळे त्याचे अजिंक्य ठेवले, असं मधुकर रहाणे यांनी म्हटलं आहे.

नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटीचा सा.मना पार पाडला आहे. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी मंगळवारी आपल्या नावावर केली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियनांनी मोठमोठ्या बाता केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या आजी खेळाडूंसह अनेक दिग्गज माजी खेळाडूंचाही सहभाग होता. भारताला कमी लेखण्याची चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी स्वतः हे कबूल केलं आहे.

अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहा.नीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच कर्णधार विराट कोहलीने बायकोच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेतली आणि भारतीय संघाचं नेतृत्त्व संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेच्या हातात देण्यात आलं.

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघ त्यातून उभारी घेणं अशक्य मानलं जात होतं. मात्र अजिंक्यच्या नेतृत्त्वात भारतीय खेळाडूंचा खेळ चांगलाच बहरला आणि भारतीय संघाने पहिल्या पराभवानंतर देखील जोरदार कमबॅक करत मालिकाच खिशात घातली.

मोठमोठ्या बाता मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मात्र यामुळे चांगलीच नाचक्की झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेननंही हे कबुल केलं आहे. आम्ही गाबामध्ये मालिका विजयाच्या निर्धाराने आलो होतो. मात्र भारतीय खेळाडूंनी इतका चांगला खेळ केला की आम्हाला पराभूत व्हावं लागलं. भारतीय संघच या सिरीजचा खरा हक्कदार आहे, असं तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाचा माज काही आत्ताचा नाही; शरद पवारांचाही केला होता अपमान, पाहा व्हिडीओ

‘तां.डव’मुळे वातवरण ता.पलं, निर्माते आणि कलाकारांविरोधात अखेर एफ.आय.आर. दाखल

काय सांगता! ‘या’ योजनेमध्ये खाते उघडल्यास मोफत मिळतोय 10 लाख रुपयापर्यंतचा वि.मा; वाचा सविस्तर

ॲास्ट्रलियन प्रेक्षकांना झाला भारताच्या विजयाचा आनंद; दिल्या ‘या’ घोषणा

पुण्याच्या राजकारणात मोठी खळब.ळ; इतके नगरसेवक महाविकास आघाडीच्या वाटेवर?