देश

काश्मीरच्या राज्यपालांनी दिलेलं ‘ते’ आव्हान राहुल गांधींनी स्विकारलं

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 वरुन काँग्रेस नेते राहुल गांधींना अध्यक्ष राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काश्मीरची परिस्थिती पाहण्याचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान राहुल गांधींनी स्विकारलं आहे. त्याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. काश्मीरमधील कलम 370 च्या मुद्द्यावरुन भाजपला धारेवर धरणाऱ्या राहुल गांधींनी काश्मीरच्या राज्यपालांचं आव्हान स्विकारलं आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर मलिक यांनी राहुल गांधींना प्रत्युतर दिलं.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोदींनी पारदर्शकपणा दाखवून या प्रकरणी चिंता व्यक्त करायला हवी, अशी मागणी राहुल यांनी शनिवारी केली होती. कोणत्याही सांप्रदायिक दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याप्रकरणी काल माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली होती. 

जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर या राज्याचा विशेष दर्जा भगवा पक्षाने काढला नसता, असे पी. चिदंबरम म्हणाले होते. भाजपने बळाच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोपही पी. चिदंबरम यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-“राहुल, सोनिया गांधी स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि कॅमेरासमोर येऊन रडतात”

-पश्चिम महाराष्ट्र पूरात असताना मुख्यमंत्री ‘महाजनादेश’ यात्रेत मग्न- प्रकाश आंबेडकर

-धैर्यशील माने यांची पूरग्रस्तांना मदत; उचलली पाठीवर पोती

-ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना 50 लाखांचं अर्थसहाय्य- आशिष शेलार

-सावत्र वडिलांनी केलेल्या छळानंतर श्वेता तिवारीची मुलगी म्हणते…

IMPIMP