राहुल बजाज यांची अमित शहा यांच्यावर जोरदार टीका

मुंबई | प्रसिध्द उद्योगपती राहूल बजाज यांनी देशात भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण असल्याचं  वक्तव्य केलं आहे. ‘इकॉनॉमीक टाईम्स’च्या पुरस्कार सोहळ्यात भाजप सरकारवर असलेला असंतोष त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी गृहमंत्री अमित शहा व्यासपीठावर उपस्थित होते.

युपीए सरकारच्या काळात लोक खुलेपणाने सरकारवर टिका करू शकत होते. परंतु, मोदी सरकारच्या काळात जनता तसेच उद्योगपती मोकळेपणाने टिका करू शकत नाहीत. त्यांच्या मनात भीती आहे. लोक सरकारला प्रश्न का विचारु शकत नाहीत?, असा सवाल त्यांनी केला आहे.

भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. माध्यमांमध्ये मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर टिका केली जाते. देशात जर खरंच भीतीचं वातावरण असेल, तर आपण सर्वांना ती सुधारण्यासाठी एकत्र प्रयत्न करावे लागतील, असं प्रत्युत्तर अमित शहांनी राहूल बजाज यांना  यावेळी दिलं.

दरम्यान, बजाज यांनी काश्मीरची परिस्थिती, घसरता जीडीपी दर यासर्व मुद्द्यांवरून अमित शहांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-