देश

लोकसभेतल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधी शेतकरी आत्महत्यांसंदर्भात आक्रमक

नवी दिल्ली | लोकसभेतल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधी शेतकरी आत्महत्या आणि कर्ज माफीवरून आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. 

काल वायनाडमधल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. केरळमध्ये 8 हजार शेतकऱ्यांना कर्ज न भरल्याचं सांगत बँकेने नोटीस पाठवली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. 

ज्या लोकांनी दशको न् दशकं सरकार चालवलं ते शेतकऱ्यांच्या परिस्थितीला जबाबदार आहेत, असं राहुल गांधींना उत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. 

निवडणुकीच्या आधी कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन दिलं  होतं. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सरकारने कर्जमाफी दिली आणि दिलेलं आश्वासन पुर्णही केलं असं राहुल गांधींनी सांगितलं.

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकरी आणि युवकांवर लक्ष केंद्रीत केलं. 

केरळमध्ये बँकांनी चालू केलेल्या कारवाईनंतर गेल्या दीड वर्षात 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

IMPIMP