पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल- प्रियांका मैदानात!

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा जामिन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर चिदंबरम बेपत्ता आहेत. याच प्रकरणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. 

मोदी सरकार ईडी, सीबीआय आणि प्रसार माध्यमांचा गैरवापर करून चिदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप सत्तेचा चुकीचा वापर करत आहे. याचा मी निषेध करतो, असं ट्वीट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. 

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीनीही पी. चिदंबरम यांची पाठराखण केली आहे. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. सत्यासाठी नेहमी लढा देत राहू, असं प्रियांका यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

आर्थिक गैरव्यवहाराचा उत्कृष्ट नमुना असल्याचं सांगत चिदंबरम यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नमुद केलं आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेण्यास नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

चिदंबरम हे कटाचे सुत्रधार असल्याचं दिसत आहे. ते केवळ खासदार आहेत हे जामिन देण्याचं कारण असू शकत नाही. संबंधित संस्थेला परकीय निधी मिळाला, त्यावेळी ते अर्थमंत्री होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केले जाणारे आरोप निराधार आणि सूडबुद्धीने केले जात आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. असं म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला आहे.

दरम्यान, कालपासून चार वेळा सीबीआयचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरी येऊन गेले मात्र ते अद्याप बेपत्ता आहेत. 

राहुल गांधी यांचं ट्वीट-

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

-वाढदिवशीच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप करणार???

-असा असेल उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा विस्तार!

-राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले; म्हणतात…

-…म्हणून आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणतात- धनंजय मुंडे

-अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा