महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींंचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…

मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील सरकारविषयी पक्षाची भूमिका मांडली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात होते. काँग्रसेच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात असतानाच राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिल्याचं कळतंय.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे आम्ही निर्णय घेऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळायला हवी, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. आधीच राज्यात राजकीय अस्थिरतेच्या चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय गप्पांना रंग चढला होता. विरोधकांनीही काँग्रेसवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे पाटील

-रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

-कामगारांचा पोटाचा प्रश्न सोडवण्याठी बीग बी अमिताभ बच्चन यांचा पुढाकार

-“आकडे जेवढे वाढतील, तेवढं लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ; विरोधकांना सत्ता नसल्याने अपचन”

-देशात 64, 425 रूग्ण ठणठणीत होऊन घरी मात्र रूग्णवाढीचा आकडा चिंताजनक