नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच काँग्रेसचे खासदार इटलीहून परत आले होते. त्यामुळे इटलीहून आलेल्या राहुल गांधींनी कोरोनाची तपासणी केली का? असा टोला भाजपने लगावला होता. यावर काँग्रेसनं उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी हे 29 फेब्रुवारीला इटलीहून भारतात दाखल झाले. यावेळी दिल्ली विमानतळावर राहुल गांधी यांनी करोनाची तपासणी केली, असं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.
राहुल गांधी इटलीहून परतले आहेत. मात्र, त्यांनी कोरोनाची तपासणी केली आहे का? त्यांनी करोनोची तपासणी करणं आवश्यक आहे. त्यांच्यामुळे दुसऱ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते, असं म्हणत भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी टोला लगावला होता.
दरम्यान, इटलीमध्ये करोनाचे 2500 रुग्ण आढळून आले आहेत. करोनामुळे आतापर्यंत इटलीत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. राहुल गांधी इटलीत मिलानमध्ये गेले होते. त्यानंतर भारतात परतले. त्यानंतर भारतात आल्यानंतर विमानतळावर त्यांनी तपासणी केली.
महत्वाच्या बातम्या-
-मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो हे सरकार पाच वर्ष टिकणार म्हणजे टिकणार- अजित पवार
-कोणत्याही समाजाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता- इंदोरीकर महाराज
-“उद्धवजी, मुख्यमंत्रीपद संभाळणं तुमचं काम नाही”
-वॉटरग्रीड प्रकल्पाला फक्त 200 कोटी रुपये देऊन मराठवाड्याची चेष्टा- देवेंद्र फडणवीस
-“अरे बाबांनो, मी अन् मुख्यमंत्री शब्दांचे पक्के आहोत विरोधकांसारखा आम्ही शब्दांचा खेळ करत नाही”