देश

तुम्ही मला कितीही घाबरवा… मी खंबीरपणे उभा राहून अखेरपर्यंत लढत राहिल- राहुल गांधी

अहमदाबाद | मला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न करा. कितीही दाबण्याचा प्रयत्न करा. मी मुद्द्यांपासून जराही बाजूला हटणार नाही. मी लोकशाहीसाठी खंबीरपणे उभा राहिल, असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

नोटाबंदीच्या काळात अहमदाबाद जिल्हा बँकेवर 745 करोड रूपयांचा काळा पैसा व्हाईट केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. याच आरोपावरून राहुल गांधी गोत्यात सापडले आहेत. 

राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल झाला आहे. याच सुनावणीकरता राहुल अहमदाबाद कोर्टात आले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजप पैशाचं बळ वापरून राज्य सरकार पाडत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. कर्नाटकमधील आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकमधील काँग्रेस धोक्यात आलं आहे. यावरच त्यांनी आपली प्रतिक्रियी व्यक्त केली आहे.

भाजप पैसे देऊन सरकार पाडायला बघतंय. गोव्यातही तेच, ईशान्येतही तेच आणि आता कर्नाटकातही तेच होत आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधींनी कर्नाटकमधील राजकीय संकटासंदर्भात भाजपवर कडाडून टीका केली आहे.

IMPIMP