बेरोजगारीचं काही करणार आहात की नाही?? सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधी तुटून पडले!

नवी दिल्ली |  केंद्रिय मंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. रोजगार निर्मिती, मंदी या सगळ्याचं सावट आजच्या अर्थसंकल्पावर होतं. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तर काही पूर्वीच्या योजनाच नव्याने सादर केल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटवर जोरदार टीका केली आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात कुठलीच ठोस तरतूद नाही. बेरोजगारीच्या मुद्यावर कुठलाच उपाय नाही. सरकार बेरोजगारीचं काही करणार आहे की नाही??, असा सवाल राहुल यांनी केंद्र सरकारला केला आहे. या अर्थसंकल्पनेनं कररचनेला आणखी क्लिष्ट केलं आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत गुंतागुंतीचा आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडताना अडीच तासांचं अतिशय लांबलचक भाषण केलं. यामध्ये मला महत्त्वाचं काहीच वाटलं नाही. अतिशय गुंतागुंतीचा अर्थसंकल्प मोदी सरकारने मांडला, असं राहुल गांधी म्हणाले.

दुसरीकडे मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये ठोस काही नाही. नव्या बाटलीत जुनी दारू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जुन्याच योजना, मोठ्या घोषणा आणि आकडे यांनी भरलेला हा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हेडलाईन मॅनेजमेंट करणारा आहे. सर्वसामान्यांना यातून काहीच मिळणार नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वडिलांना जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे

-“आजच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कुठंय?…. मोदींनी नव्या बाटलीत जुनी दारू ओतलीये”

-“काश्मीर संदर्भातील कविता सादर केल्याने एक बिलीयन डॉलरचा तोटा भरून निघणार नाही”

-जाणून घ्या…… मोदी सरकार तुमच्या किती पैशावर किती टॅक्स लावणार???