दिल्ली : जम्मू काश्मिर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर आणि प्रवक्ते रविंदर शर्मा यांना पत्रकार परिषद सुरू असतानाच पोलिसांनी अटक केली. काँग्रेस नेत्यांच्या अटकेचा राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त करत सरकारचा हा वेडेपणा कधी थांबणार आहे??, असा सवाल उपस्थित केला आहे. गुलाम अहमद मीर आणि रवींदर शर्मा यांनी शुक्रवारी जम्मूत पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषद सुरू असतानाच दोन्ही नेत्यांना जम्मू पोलिसांनी अटक केली. काँग्रेसने ही माहिती ट्विटवरून दिली आहे.
पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच भडकले आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून याचा निषेध केला.
गुलाम अहमद मीर आणि रवींदर शर्मा यांना जम्मूमध्ये केलेल्या अटकेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. एका राष्ट्रीय पक्षाच्या विरोधात केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर आणखी एक हल्ला केला आहे. हा वेडेपणा कधी थांबणार आहे?, असा सवाल राहुल गांधी यांनी ट्वीटवरून विचारला आहे.
मोदी सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी या निर्णयावर आक्रमक झाले आहेत. जम्मू काश्मिरमधील हिंसाचारावरही राहुल गांधी आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.
जम्मू काश्मिरचे राज्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरात येण्याचेही आमंत्रण दिले होते. त्यानंतर राहुल गांधींनी मी विनाअट काश्मीरात येण्यास तयार असल्याचेही म्हटले होते.
दरम्यान, काश्मिरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना काँग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या कारवाईने राहुल गांधी चिडले आहेत.
I strongly condemn the arrest of our J&K PCC Chief, Shri Ghulam Ahmed Mir & spokesperson, Shri Ravinder Sharma in Jammu today. With this unprovoked action against a national political party, the Govt has delivered democracy another body blow. When will this madness end? https://t.co/1z3e7qHCDE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 16, 2019
महत्वाच्या बातम्या-
-मोदी सरकारचा वेडेपणा थांबणार तरी कधी??; राहुल गांधी भडकले
-सुनील तटकरेंना मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकानं केला शिवसेनेत प्रवेश
-पूरग्रस्तांना गायी, म्हशी द्या; महेश लांडगेंचं दहिहंडी आणि गणेश मंडळांना आवाहन
-बाळासाहेबांमुळे गिरणी कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री झाला- नारायण राणे
-बीडचा दुष्काळ हटवण्यासाठी पंकजा मुंडेंची योजना; मुख्यमंत्र्यांकडे सादर